१६ वॉर्डाची तहान भागवणारा हर्मूल तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर...

Foto
पाणीसाठा अवघा आठ फुटावर : जुने शहरावरही होणार परिणाम
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): यंदा पावसाने दांडी मारल्याने शहरातील ऐतिहासिक हर्सल तलावातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर खाली आला आहे.
तलावात सध्या अवघा आठ फूट पाणी उरले असून, त्यावर अवलंबून असलेल्या जुन्या शहरासह हडको परिसरातील १६ वॉर्डावर भीषण जलसंकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तलावातील पाणी पूर्णपणे संपण्यापूर्वी दिल्लीगेट येथील नवीन जलकुंभमहापालिकेच्या ताब्यात घेऊन जायकवाडी धरणातून पर्यायी पाणीपुरवठा सुरू करण्याची
तातडीची मागणी जोर धरू लागली आहे.
हसूल तलावाची एकूण साठवण क्षमता २९ फूट आहे. मात्र, यंदा कमी पाऊस झाल्याने तलावातील पाण्याची पातळी
अवधी १६ ते १८ फुटांपर्यंतच पोचू शकली होती. ऑक्टोबर महिन्यातच हा साठा घटून आठ फुटांवर आला आहे. सध्या हडको आणि जुन्या शहरातील संबंधित प्रभागात पाच ते
आठ दिवसांच्या १६ अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीसाठा वेगाने संपत असल्याने आगामी काळात पुरवठा सुरळीत ठेवणे महापालिकेसाठी जिकरीचे ठरणार असल्याचे चित्र आहे.
पिवळसर, मातीमिश्रित पाणी
हसूल येथून पाणीपुरवठा दूषित होत आहे. नळाला पाणी आल्यावर सुरुवातीचा अर्धा तास पिवळसर व मातीमिश्रित पाणी येत असल्याच्या, तसेच तीन ते चार दिवसांनंतर साठविलेल्या पाण्यात अळ्या व जंतू होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. या पार्श्वभूमीवर हसूल तलावाचे दूषित पाणी बंद करून जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
...तर पाण्याअभावी होणार हाल
हसूल तलावातील पाणी संपण्यापूर्वी शहागंज येथील जलकुंभातून पाणी उचलून ते दिल्लीगेट येथील नवीन जलकुंभात आणणे आणि तेथून संबंधित वॉर्डाना वितरित करण्याचे नियोजन महापालिकेने आखले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीने दिल्लीगेट जलकुंभाचे काम पूर्ण केले आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे हा जलकुंभ अद्याप महापालिकेच्या अधिकृत ताब्यात आलेला नाही. हस्तांतरणाची प्रक्रिया लांबल्यास दिवाळीच्या तोंडावर या १६ वॉडांतील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळित होऊन नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions